सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हेंचा दणदणीत विजय ; पुण्यात मोहोळ तर मावळात बारणे
पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई पुणे जिल्ह्यातील ४ मतदारसंघात झाली. त्यापैकी भाजपला १, शिंदे गट शिवसेनेला १, तर महाविकास आघाडीतील शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर यश मिळाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. त्यांना स्वतःच्या पत्नीला सुध्दा निवडून आणता आले नाही.
पुणे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय, तर मविआचे रवींद्र धंगेकर, आणि वंचितचे वसंत मोरे यांचा पराभव झाला.
सर्वाधिक चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची झाली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला, तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीतील सुप्रिया सुळे यांनी १ लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.
शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे. डॉ.कोल्हे यांची शरद पवारांच्या बाबत असलेली निष्ठा फळाला आली.
मावळमधून महाविकास आघाडीचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले आहेत. संजोग वाघेरे यांचा पराभव झाला आहे. वाघेरे तिसऱ्या वेळी खासदार झाले असून शिंदे गट शिवसेनेने झेंडा रोवला आहे.