महापुरुषांच्या सन्मानासाठी पुण्यात रास्ता रोको आंदोलन.

धायरी:-महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतीके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शुक्रवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पुण्यात नवले ब्रिज, गाडीतळ हडपसर, किवळे याठिकाणी कार्यकर्त्यांनी रास्ता रोखुन धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान, काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळिमा फासणाऱ्या व सकल हिंदूंचा अपमान करणाऱ्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणारा गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा’ कायदा पारित करावा, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची भावना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली. नवले ब्रिज येथील रास्ता रोको आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *