माय मेडपॅथ डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन.
धायरी:-वडगाव बुद्रुक येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन “माय मेडपॅथ डायग्नोस्टिक सेंटर” यांच्यावतीने शुगर ,बीपी यासारख्या अन्य तपासण्यांसोबत मोफत औषधे वारकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती माय मेड पॅथ पॅथॉलॉजीच्या अध्यक्ष उमा रसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदी वातावरणात वारकऱ्यांना सेवा देण्याचे काम केले.
तसेच यावेळी दोन दिवस मुक्कामी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका येथील दिंडी सोहळ्यात आलेल्या जवळपास अडीचशे लोकांना दोन दिवस अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळ व व्यंकट साई होंडा यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्रांना दांगट ,रामचंद्र पोळेकर “माय मेडपॅथ”चे अध्यक्ष उमा रसाळ, संतोष कदम,
वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांचा पंधरा दिवस प्रवास हा ऊन वारा पाऊस यामध्ये होणार असून वारकऱ्यांनी घ्यावयाची काळजी वारीमध्ये येणारे अनेक वारकरी महिला पुरुष हे वय जास्त असल्याकारणाने त्रासाने ग्रासलेले असतात त्यामुळे त्यांनी आपल्या सोबत आपल्या सोबत घेतलेल्या गोळ्या वेळेत घ्याव्या आहारावर नियंत्रण ठेवावे तसेच कुठल्या प्रकारचा जर त्रास झाला तर त्यांनी वारी सोबत असणाऱ्या मेडिकल कॅम्प कॅमशी संपर्क साधावा. “आपली वारी आरोग्य वारी” असे मायमेडप्यात पॅथॉलॉजीच्या अध्यक्ष उमा रसाळ यांनी सांगितले.