वनराज अंदेकर गोळ्या झाडून हत्या

पुणे ,दि. १,माजी नगसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. असल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली.दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर ही घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. ही

माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. तणावाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच संशयितांच्या घराजवळही बंदोबस्त लावण्यात आला आहे.

एकूण परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस हा बंदोबस्त राहण्याची शक्यता आहे. घटनेपूर्वी या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेतली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आंदेकर यांना रुग्णालयात दाखल केले; पण रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, कौटुंबिक तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात तिघांवर संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आंदेकर टोळीचा एकूण इतिहास पाहता या घटनेचे पडसाद भविष्यात उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *